सतीप्रथेविषयी माहिती

सतीप्रथेविषयी माहिती राजा राम मोहन रॉय मराठी मध्ये

सतीप्रथेविषयी माहिती

पती मृत झाला असता त्याच्या प्रेताबरोबर सहगमन करणारी स्त्री. सती या संज्ञेचा सर्वसामान्य शब्दार्थ साध्वी, तपस्विनी किंवा पतिव्रता असा आहे. या आत्मदहन किंवा सहमरण कृतीला सतीप्रथा म्हणतात. सहमरण, सहगमन, अनुमरण, अन्वारोहण इ. संज्ञांनीही सतीप्रथेचा निर्देश करण्यात येतो.सतीप्रथेविषयी माहिती

इतिहास

सतीप्रथा प्राचीन असून ती जगातील विविध देशांत व जातींत आढळते. आर्यांच्या अनेक टोळ्यांपैकी सिथियनांसारख्या इंडो-जर्मानिक टोळीत सती जाण्याची प्रथा प्रचलित होती. तिचे अनुकरण भारतातील एतद्देशीय लोकसमूहांनी केले, असा सांस्कृतिक इतिहासकारांचा दावा आहे. पी.थॉमस, मोनिअर विल्यम्स, अ. स. अळतेकर आदी विव्दानांच्या मते जगातल्या अनेक प्राचीनतम टोळ्यांच्या समाजव्यवस्थेत, यूरोप व अतिपूर्वेकडील देशांत सती जाण्याची प्रथा प्रचलित होती. वैदिकपूर्व काळात सतीची प्रथा भारतातील काही लोकसमूहांत रूढ होती, असे इतिहासकारांचे मत आहे.सतीप्रथेविषयी माहिती

सतीप्रथेविषयी माहिती

सतीची प्रथा भारतातील मुख्यत्वे बंगाल, राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, काश्मीर आदी प्रदेशांतून अस्तित्वात असल्याचे दाखले शिलालेख, प्राचीन संस्कृत साहित्य आणि परदेशी प्रवासी यांच्या वृत्तांतातून मिळतात. यूआनच्वांग, व्हेनिसचा काँती, झां ताव्हेर्न्ये, फ्रान्स्वा बर्निअर, बार्बोसा, निकोलाव मनुची इ. परदेशी प्रवाशांनी सतीचे प्रसंग प्रत्यक्ष पाहून त्यांची वर्णने लिहून ठेवली आहेत. सती जाण्याचा विधी प्रदेशपरत्वे प्रथापरंपरेनुसार वेगवेगळा असल्याचे व त्यात कालानुरूप बदल झालेले आढळतात. शुद्धीतत्त्व या गंथात सतीच्या विधींचे तपशीलवार वर्णन आढळते.सतीप्रथेविषयी माहिती

वात्स्यायना च्या कामसूत्रा त व पद्मपुराणा त सतीप्रथेचे उल्लेख आलेले आहेत; तथापि गुप्तकाळात सतीची अत्यल्प उदाहरणे दिसतात. वराहमिहिर बृहत्संहिते त सतीप्रथेची निर्भत्सना करतो. बाणभट्टाच्या कादम्बरी व हर्षचरिता त तसेच निर्णयसिंधू व धर्मसिंधू त सतीप्रथेबाबत काही उदाहरणे नोंदविली आहेत; पण बाणभट्ट कादम्बरीत या चालीचा उल्लेख करून तिचा कडक शब्दांत निषेध करतो आणि मूर्ख लोक या चालीचा अंगीकार करतात, असे मत प्रदर्शित करतो. बाणाच्या मते मोहाने घडत असलेला हा प्रभाव आहे. आत्महत्येमुळे सती जाणारी व्यक्ती नरकात जाते. बाणाच्या या विचारसरणीमुळे त्याला सतीप्रथेचा पहिला बुद्धीनिष्ठ विरोधक म्हणावयास हरकत नाही. महानिर्वाणतंत्रा तही मोहाने सती जाणारी स्त्री नरकात जाते, असे म्हटले आहे.

Also See : शिवाजी महाराज यांची पूर्ण माहिती 

असे असूनही उत्तर भारतात आठव्या ते अकराव्या शतकांदरम्यान, विशेषत: काश्मीरमध्ये अनेक स्त्रिया सतीप्रथेला बळी पडलेल्या दिसतात. तत्संबंधीचे उल्लेख कल्हणाच्या राजतरंगिणी त आढळतात. यांत केवळ राजघराण्यांतील स्त्रिया नसून राजाच्या रखेल्या, बहिणी, आई याही सहगमन करीत असत, असे कल्हण म्हणतो. राणी सूर्यमतीसमवेत गंगाधर, टाक्किबुद्घ व दंडक हे सेवक आणि उद्दा, नोनीकाषवल्गा या दासी इ. सर्वांनी अग्निप्रवेश केला (७.४८१); मात्र हिंदूंच्या धर्मशास्त्राने सतीप्रथेला मान्यता दिलेली नाही. मनूने या प्रथेची दखलही घेतली नाही. विष्णुस्मृती त या प्रथेचा निषेध केलेला आहे. उपनिषदे, जैन व बौद्ध धर्मसाहित्य इत्यादींत सतीप्रथेबाबत उल्लेख सापडत नाहीत. वेदपूर्वकाळात सतीची प्रथा थोडयाफार प्रमाणात प्रचलित असली पाहिजे; कारण ऋग्वेद व अथर्ववेदां तील काही उल्लेखांवरून या प्राचीन प्रथेचे स्मरणांश आढळतात. मात्र वैदिक आर्य हे जीवनवादी विचारांचे पुरस्कर्ते होते.सतीप्रथेविषयी माहिती

वायुपुराणा त (१०.२७) सांगितल्याप्रमाणे प्रजापती दक्ष व प्रसूती यांची कन्या आणि शंकराची पत्नी सती या नावाने प्रसिद्ध आहे. स्वत:च्या वडिलांनी यज्ञप्रसंगी आपल्या पतीचा अवमान केल्यामुळे रागाच्या भरात दक्षकन्या सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वदेहदाह केला. सतीप्रथेचा संबंध याही कथेशी जोडला जातो. पद्मपुराणा त सतीप्रथेचा जो उल्लेख सापडतो, तो फक्त क्षत्रिय वर्णापुरताच मर्यादित आहे. रामायणा त कोणत्याही स्त्रीने सहगमन केल्याचा उल्लेख नाही; परंतु महाभारता त पांडूची पत्नी माद्री सती गेल्याचा उल्लेख आढळतो. तद्वतच बाह्मणी आंगिरसीने (महा. आदि. १८१.२२) अग्निप्रवेश केल्याचा उल्लेख आहे. कर्नाटकातील बेलतुरू येथील इ. स. १०५७ च्या शिला-लेखात एक शूद्र स्त्री सती गेली म्हणून तिच्या स्मरणार्थ सतीशिला उभी केल्याचा उल्लेख आहे. यावरून इतिहास काळात राजघराण्यांतील स्त्रियाच केवळ सती जात नसत, तर अन्य सामान्य स्त्रियाही सती जात असत, असे दिसते.

राजा राम मोहन रॉय

Also See : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्ण माहिती 

सती जाण्याच्या प्रथेची कारणमीमांसा विविध प्रकारे करण्यात आली आहे. अग्नीला साक्ष ठेवून वधू-वरांनी आमरण एकमेकांबरोबर जगण्याची शपथ घेतलेली असते. अशा श्रद्धेतून पतीच्या निधनाबरोबर पत्नीने सहगमनाचा मार्ग स्वीकारून सती जाण्याची प्रथा रूढ झाली असावी. यामागे परलोकातही पतीशी पुनर्मीलन व्हावे, अशी अपेक्षा असावी. सतीप्रथा हे समाजातील पुरूषप्रधानतेचे उदाहरण आहे. पति-निधनानंतरही त्याचा पत्नीच्या देहावरचा आणि जीवनावरचा हक्क संपत नाही, हेच या प्रथेतून सूचित होते. योनिशुचिता अत्यंत महत्त्वाची मानली गेल्याने, विधवा स्त्रीचे शील संरक्षितच राहावे, म्हणून ती पतीच्या चितेवरच सती गेलेली बरी, अशी भूमिका दिसते. त्याचप्रमाणे सती न गेल्यास विधवा स्त्रीने विकेशा व्हावे, वीरक्त जीवन जगावे, तसेच तिला पुनर्विवाह करण्यास बंदी असे. विधवा स्त्रीला ती मरेपर्यंत पोसायचे त्यापेक्षा ती मेलेलीच बरी, असाही एक दृष्टिकोन होता.

त्यामुळे अशा मरणप्राय जिण्यातून सुटका व्हावी, या अपेक्षेतून ती सती जाण्याचा मार्ग स्वीकारत असावी. सती गेल्यामुळे स्त्रीला मोक्ष मिळतो, अशीही समजूत आढळते. पतीला परमेश्वर मानून त्याच्यावरील निस्सीम प्रेम, निष्ठा, कृतज्ञता इ. व्यक्त करण्याची प्रतीकात्मक कृती म्हणजे सती जाणे होय, असेही म्हटले जाते. पातिवत्य संपुष्टात आल्याची निदर्शक अशीही प्रथा आहे, असेही मानले जाते. मृताबरोबरच त्याच्या गरजेच्या वा आवडत्या वस्तू पाठविण्याची रीत काही जमातींत आढळते. सतीप्रथेशी याही प्रथेचा संबंध असावा, असे दिसते. वीरपतीची वीरपत्नी घराण्याची प्रतिष्ठा उंचावते, या समजुतीतून क्षत्रिय जातीत सतीची प्रथा रूढ झाली असावी. बंगाल प्रांतात स्त्रियांना कुटुंबाच्या मिळकतीच्या मालकी हक्कात जास्तीत जास्त वाटा देण्याची पद्धत आहे.

Also See : प्रतापगड किल्ल्याचा इतिहास 

हा त्यांचा हक्क डावलण्यासाठी व त्यांचा अडसर दूर करण्यासाठी तेथे सतीची प्रथा सुरू झाली असावी. अरबांची आणि तुर्कांची आकमणे सुरू होताच व नंतर मोगलकाळात सतीप्रथेला जोहारचे स्वरूप प्राप्त झाले. हिंदू स्त्रियांवर विशेषत: राजपूत स्त्रियांवर जे अत्याचार होत, त्यांच्या भीतीतून जोहार करण्याची म्हणजे सती जाण्याची प्रथा दृढ झाली असावी. याकाळात सततच्या युद्धप्रसंगांमुळे राजवंशांतील आणि सामान्य स्त्रियांतील सतींची संख्या वाढू लागली होती.

ही प्रथा स्त्रीच्या वैयक्तिक इच्छेनुसार स्वीकारली गेली की, पुरूषप्रधान समाजव्यवस्थेच्या दडपणामुळे अनुसरली गेली, यांबाबत निर्विवादपणे काही सांगता येणे कठीण आहे. मात्र विधवा स्त्रियांची मानसिकता आणि अवस्था बदलण्याचा व सुधारण्याचा प्रयत्न परंपरागत पुरूषप्रधान समाजव्यवस्थेने कधीही केला नाही, असेच म्हणावे लागेल. विधवा स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा पारंपरिक दृष्टिकोन असामाजिक, अमानवी व अत्यंत हीन प्रवृत्तीचा होता, असे म्हणावे लागेल. ज्या विशिष्ट प्रांतांत व जाति-जमातींत सतीची प्रथा प्रचलित होती, तेथेही ती ऐच्छिक स्वरूपाची न राहता समूहाच्या दबावातून निर्माण झाली असावी, असा बहुसंख्य विचारवंतांचा दावा आहे.सतीप्रथेविषयी माहिती

स्वातंत्र्योत्तर काळात राजस्थानसारख्या प्रांतात सती जाण्याच्या ज्या घटना घडून आल्या, त्यास सामाजिक दबाव हेच कारण जबाबदार धरलेले आहे. प्राचीन हिंदू धर्मशास्त्राने सतीप्रथेचा निषेध केलेला असला, तरी काही स्मृतिकारांनी तिला अंशत: संमती दिली असून त्यांनीच स्त्री गरोदर असेल किंवा तिचे मूल लहान असेल वा ती पतिनिधनाच्या वेळी रजस्वला असेल, तर तिने सहगमन करू नये, असे निर्बंधही निर्माण केले होते. ही कूर चाल बंद करण्यासाठी अकबर-जहांगीर या मोगल समाटांनी प्रयत्न केले; पण धार्मिक जीवनात हस्तक्षेप केल्याच्या कारणास्तव त्यास म्हणावे तसे यश मिळाले नाही.

Also See : शिवनेरी किल्ल्याची माहिती 

इ. स. १५१० साली गोव्याचा गव्हर्नर अफांसो द अल्बुकर्कने गोव्यात सती जाण्याच्या प्रथेवर बंदी घातली. कबीर, नानक यांनीही तसेच प्रयत्न केले. नानकासारखे संत म्हणतात, विधवेवर सतीची सक्ती काय म्हणून ? ब्रिटिश राजवटीत मौंट स्टूअर्ट एल्फिन्स्टन, कॉर्नवॉलिस, वेलस्ली इत्यादींनी यासंदर्भात प्रयत्न केले; परंतु लॉर्ड विल्यम बेंटिंकचे प्रयत्न हे अनन्यसाधारण आहेत.

अव्वल इंग्रजी अंमलात एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत ज्ञानोदय, सुधारक, समाचार, बंगाल हुरकुरू, संवाद कौमुदी इ. वृत्तपत्रे-नियतकालिके आणि दुसरा बाजीराव, विदयालंकार, महात्मा फुले, गौरीशंकर भट्टाचार्य, कालीनाथ रॉय, मथुरानाथ मलिक, प्रसन्नकुमार टागोर, रामकृष्ण सिन्हा, आगरकर अशा काही विद्वान विचारवंतांकडून सतीप्रथेला विरोध होत असतानाही पंजाबसारख्या प्रांतात किंवा बंगालमध्ये सती जाणाऱ्या स्त्रियांची संख्या अन्य प्रांतांच्या मानाने लक्षणीय होती. पंजाबातील संस्थानांतून राजेलोकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राण्या सती गेल्याची अनेक उदाहरणे आढळतात.

रणजितसिंगाच्या प्रेताबरोबर त्याच्या चार स्त्रियांना जाळण्यात आले होते. राजा सुचेतसिंगाच्या अंत्यसंस्कारात तीनशे-दहा स्त्रियांनी आत्मदहन केले होते. त्यांत दहा राण्या व तीनशे रखेल्या होत्या; परंतु सरदार शानसिंगाची पत्नी सोबाव मात्र स्वेच्छेने सती गेली होती. पंजाबमधील ही अखेरची सती, असे सर लिपल गिफीन इ. स. १८९८ मध्ये एका लेखात नोंदवितो.

राजा राम मोहन रॉय

सती प्रथेशी संबंध आणि विरोध

इ.स. १८१२ मधे त्यांचे थोरले बंधू जगन्मोहन यांचा मृत्यू झाला. त्याप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांनी बळजबरीन जगन्मोहन यांच्या पत्नीला सती जायला लावल. राम मोहन यांनी त्याप्रसंगी विरोध केला, पण तो प्रकार थांबवू शकले नाहीत.

त्या काळात स्त्रीया सती जाण्याच प्रमाण प्रचंड होत. तत्कालीन पंडीतांच्या मते पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीपुढे दोनच पर्याय असत. एक म्हणजे सर्व सुखांचा त्याग करून अत्यंत कठोर नियमांनी बद्ध अस जीवन जगणे किंवा दुसरा पर्याय म्हणजे सती जाणे. एकदा स्त्रीनं सती जाण्याचा निर्णय घेतला असता तिला त्यापासून परत फिरता येत नसे. अर्थात ज्या समाजात स्त्रीला मूळातच दुय्यम स्थान होत (/आहे) आणि जिला स्वतःचा आवाजच नव्हता ती हा निर्णय स्वतः घेत असेल ही शक्यताही धूसरच आहे.

भावनेच्या भरात एखाद्या स्त्रीन असा निर्णय घेउन नंतर चितेवर गेल्यावर तिथून परत फिरायचा प्रयत्न केला तर तिला मोठ्या मोठ्या बांबूंच्या सहाय्यान आत ढकलंल जात असे. तिचा आक्रोश कोणाला ऐकायला येउ नये यासाठी तिथ मोठ-मोठी वाद्य वाजवली जात. कलकत्त्याच्या स्मशानभूमीत वाद्यांच्या गजरात पतीच्या चितेवरती बळजबरीन जाळल्या जाणार्‍या स्त्रीया हे नेहमीच दृश्य असे. बरेचदा त्या स्त्रीला नशा येणारा भांग किंवा तत्सम पदार्थ दिला जात असे आणि त्या अमलाखाली असतानाच ती चितेवर गेली की तिला तिच्या मृत पतीच्या प्रेताशी बांधून टाकण्यात येई.

बंधू च्या मृत्यूनंतर अशाप्रकारे त्यांच्या पत्नीला देखील जाळल्यामुळ राम मोहन प्रचंड व्यथित झाले आणि त्यांनी सती प्रथे विरोधात मोहीम उघडली. राम मोहन बाबू स्मशानात जाउन सती जाणार्‍या स्त्रीयांच मन वळवायचा, त्यांना सती जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत.

ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीन १७९८ साली कलकत्त्यामधे सर्वप्रथम सतीबंदी कायदा लागू केला. परंतु हा फक्त कलकत्ता शहरापुरताच लागू होता.त्यानंतर विल्यम कॅरे हा ख्रीश्चन मिशनरी आणि विल्यम विल्बरफोर्स या दोघांनी सती प्रथेविरुद्ध आंदोलन आणि प्रचार सुरु केला. याची दखल घेउन कंपनी सरकारन १८१३ मधे सती जाणार्‍या स्त्रीयांची मोजणी सुरु केली.

सती प्रथा कशी बंद झाली

४ डिसेंबर १८२९ रोजी भारतात सतीबंदी कायदा अस्तित्वात आला आणि एक अघोरी प्रथा बंद पडली. त्याला यंदा ८४ वर्षे पूर्ण होत आहेत. इतिहासाच्या पानात डोकावून या प्रथेच्या काळात स्त्रीला सोसाव्या लागलेल्या अन्यायाचा हा धावता आलेख.गतवर्षी कोकणात गेले अन् एका गावातील प्रतिष्ठित घराण्यात घडलेल्या घटनेचा मागोवा घेणं झालं. हकीकत अशी होती की २६ ऑक्टोबर १८२० रोजी त्या घरातील तरुण सून रखमाबाई स्वेच्छेने सती गेली. त्या घरातील कोणीही स्त्री यापूर्वी किंवा त्यानंतर सती गेली नाही.

शेताडीत चिऱ्यांनी बांधलेलं ते स्थान मी आवर्जून पाहिलं. आजही त्या घरातील व गावातील नवविवाहिता या स्थळी जाऊन ओटी भरतात. समजलेल्या माहितीनुसार रखमाबाई अतिशय शांतपणे सती गेल्या. त्यांच्या पतिनिष्ठेपुढे मी नतमस्तक झाले अन् ‘सती’ शब्दाचा मागोवा घेत थेट वैदिक काळात जाऊन पोहोचले. स्त्रीशिक्षण व स्वातंत्र्याबाबतीत वेदकाल सर्वार्थाने संपन्न होता. उपनिषदात स्त्री-विचारवंतांचा उल्लेख आढळतो. गुरुकुलांमध्ये स्त्री-आचार्याची नियुक्ती होत असे. समाजात स्त्रीला अत्यंत मानाचं स्थान होतं त्यामुळे सती ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती.

संस्कृतमध्ये सती शब्दाचा अर्थ पवित्र स्त्री (सहगमन करणारी नव्हे.) रामायण काळात दशरथाच्या मृत्यूनंतर कौसल्यादी स्त्रिया सती गेल्या नाहीत. प्रकांडपंडित मेधा तिथी व हर्षकालातील बाण यांच्या मतानुसार सती म्हणजे आत्महत्या असून ती संकल्पना तद्दन मूर्खपणाची आहे.

गुप्तकाळात अनुकरण पद्धत रूढ होती, पण त्यामध्ये मृत व्यक्तीचा दास, दासी किंवा जवळचा नातलग सहगमन करीत असे. जपानमध्ये खानदानी स्त्रिया शत्रूच्या हाती लागू नये म्हणून टॅन्टो, कैकेन किंवा जिगाकी करून मृत्यू पत्करायच्या. काँगो, मेक्सिको, चीन, इजिप्त या देशांमध्येसुद्धा वेगवेगळय़ा पद्धती अस्तित्वात होत्या. काँगोमध्ये राजाच्या निधनानंतर बारा सुस्वरूप तरुणी राजाच्या शवाबरोबर जिवंत पुरण्याची पद्धत होती.

आपल्याकडे गुप्तकाळानंतर परकीय आक्रमणं वाढली अन् पहिला घाला स्त्री-स्वातंत्र्यावर पडला. पराशर स्मृतीनुसार रजस्वला, गरोदर व लहान अपत्य असलेल्या स्त्रीला सती जाण्यास संमती नसली तरी मुघल काळात सती जाणं राजरोस सुरू झालं. विशेष बाब अशी की, मुघल बादशाहांनी म्हणजे हुमायुँ, अकबर, शहाजहाँ अन् औरंगजेबाने सुद्धा सतीच्या प्रथेला कडाडून विरोध केला. अकबराने सती जाणाऱ्या स्त्रीला परावृत्त करण्यासाठी निर्वाह वेतन व बक्षिसांची खरात करण्याच्या सूचना दरोगांना देऊन ठेवल्या होत्या. औरंगजेबाने डिसेंबर १६६३ मध्ये सतीविरोधी फतवाच जारी केला होता. मुघल काळात म्हणजे सन १३३३-३४ मध्ये भारतभेटीला आलेला जगप्रवासी इब्न बतुताने आयुष्यात प्रथमच सतीचा भयंकर प्रकार बघितला आणि तो तिथेच बेशुद्ध पडला. त्यानंतर मात्र बतुताने अशा प्रसंगी जाणं जाणीवपूर्वक टाळलं.

मुघल शहजादा दारा शुकोह याचा खास हकीम फ्रास्नवा बर्ने यांने ४ ऑक्टोबर १६६७ रोजी पर्शियातील मुझेर चॅपलेन यास धाडलेल्या पत्रात नमूद केलंय की त्याने सुरत व आसपासच्या भागात सतीच्या अनेक घटना बघितल्या. त्यापैकी बऱ्याच वेळा या स्त्रिया चितेबाहेर पडण्याचा प्रयत्न करत, पण जमलेले नातलग त्यांना बळजबरीने पुन्हा आत ढकलत असत. हे पाहणेही क्रूर वाटे.बर्नेने लाहोर येथे पाहिलेला प्रसंग फारच हृदयद्रावक आहे. सती जाणारी ही स्त्री केवळ बारा वर्षांची अजाण पोर होती. अत्यंत सुंदर, गोरीपान व नाजूक कांतीच्या या मुलीला तिच्या आजीने कडेवर घेतलं होतं. ती पोर खूप घाबरली होती. आईच्या नावाने आकांत करीत होती, पण तिच्या रडण्याकडे लक्ष न देता तिचे हात-पाय बांधून तिला चितेवर चढवण्यात आलं.

चिता पेटली अन ते अश्राप सौंदर्य कापरागत भुरूभुरू जळताना पाहणं बर्नेला असह्य़ झालं. स्वत:च्या नाकर्तेपणाला दोष देत, डोळे टिपत तो तिथून बाहेर पडला.फॅनी पर्कस ही ब्रिटिश गृहिणी ७ नोव्हेंबर १८२३ रोजी उत्तर प्रदेश येथे घडलेल्या घटनेचा उल्लेख करते. एका श्रीमंत बनियाची तरुण पत्नी कुटुंबीयांच्या दबावाखाली सती जाण्यास तयार झाली. पण चिता पेटताच वेदना असह्य़ होऊन तिने चितेबाहेर उडी मारली अन् तीरासारखी गंगेच्या दिशेने धावत सुटली. घटाघटा पाणी पिऊन तिने गंगेच्या थंडगार पाण्यात लोळण घेतली. एवढय़ात तिला पकडण्यासाठी नातलग मंडळी धावली. पण तिथे हजर असलेल्या एका ब्रिटिश मॅजिस्ट्रेटने त्यांना अटकाव केला व त्या स्त्रीला पालखीत घालून इस्पितळात नेलं. एका ब्रिटिश अधिकाऱ्यामुळे त्या अभागिनीचे प्राण वाचले.

वरील घटनांना छेद देणारी एक सकारात्मक घटना सन १७६९-७०मध्ये घडली. रामजी मल्हार जोशी हे कोकणातील तळेगावचे कुलकर्णी. त्यांचा मुलगा नारोबा यास प्रथम पत्नीपासून दोन मुली झाल्या. वंशास पुत्र हवा म्हणून नारोबाने पुनर्विवाह केला, पण त्यानंतर काहीच दिवसांत त्याचं निधन झालं. पत्नी चिमाबाई सती जाण्यास सिद्ध झाली. रामजी मल्हार व त्याच्या नातेवाईकांनी लाख समजावलं, पण चिमाबाई हेका सोडेना. अखेर सोयरे आप्पाजी सदाशिव यांच्या चार मुलांपैकी एकास दत्तक घेण्याचं ठरलं. बऱ्याच प्रयत्नांती सदाशिवची पत्नी मनुबाई पुत्र देण्यास तयार झाली. चिमाबाईला पांडुरंग हा दत्तक-पुत्र मिळाला व त्या आनंदात तिने सती जाणं रहित केलं.

त्यावेळच्या कर्मठ पाश्र्वभूमीवर रामजी व त्याच्या नातेवाईकांच्या पुरोगामी वर्तनाचं कौतुक करावं तेवढं थोडंच, पण अशी घटना एखादीच. एरव्ही खानदान व प्रतिष्ठेच्या नावाखाली अनेक चिता जळत होत्या. सन १८१२! बंगालमधील जगमोहन रॉय यांचं निधन झालं व त्यांची रूपवती पत्नी अलकमंजिरीचं सती जाणं निश्चित झालं. सौभाग्यलंकार घातलेली अलकमंजिरी भीतीने थरथरत होती. राममोहननी आपल्या कुटुंबीयांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ.

हातपाय बांधलेल्या अलकमंजिरीला चितेने स्वाहा केलं. घटना घडली. राख झाली, पण राजा राममोहन मात्र पेटून उठले. त्यांच्या डोक्यात आग भडकली. सतीची प्रथा बंद करण्याचा निश्चय त्यांनी केला अन् वेद, पुराण व श्रुतींचं वाचन व मनन सुरू झालं. निष्कर्ष निघाला. वैदिक संस्कृतीत सतीला थारा नाही. सतीची संकल्पनाच मान्य नाही. राममोहनजींचा उत्साह द्विगुणित झाला. त्यांनी लॉर्ड बेंटिंक व इतर विधिज्ञांशी चर्चा केली. हिंदू धर्मीयांच्या भावनांना हात घालण्यास ब्रिटिश सरकार कचरत होतं, पण राजाजी ठाम राहिले. अखेर ४ डिसेंबर १८२९ रोजी लॉर्ड बेंटिंकने सतीबंदी कायदा आणला. राममोहनजींची प्रतिज्ञा पूर्ण झाली. सतीला न्याय मिळाला.ब्रिटिश गेले. देश स्वतंत्र झाला, पण रूढींचं ंजोखड अद्याप उतरलं नव्हतं. १९५४ रोजी जोधपूर येथे सिसोदीया घराण्यातील सगुणकुंवरबा, १९८७ रोजी राजस्थान, देवराळाची रूपकुंवर व १९९९ मध्ये उत्तर प्रदेशची चरण शाह सती गेली. या तिन्ही स्थानांची आजही पूजा-अर्चा केली जाते.

आपल्याकडे अनेकदा प्रशासकीय व पोलीस यंत्रणा निष्क्रीय राहते. ब्रिटिश काळात मात्र १८२९ च्या सतीबंदी कायदा अंमलबजावणीसाठी एक जिल्हाधिकारी किती कष्ट घेतो हे पाहण्याजोगं आहे. कर्नल विल्यम स्लीमन हा जबलपूरचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना गोपालपूर गावातील उमेदसिंग उपाध्यायची ६० वर्षीय वृद्ध पत्नी सती जाणार असल्याची खबर त्याला मिळाली. खबर मिळताच स्लीमन बेराघाटपर्यंत सात मैल घोडय़ावरून व नंतर तीन मैल पायी गोपालपूरला आला. त्या स्त्रीला समजावण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. पण तिने अन्न त्यागाची धमकी दिली. नाइलाजास्तव स्लीमनने परवानगी दिली. नवलाची बाब म्हणजे ती वृद्धा अत्यंत आनंदाने व शांतपणे चितेवर चढली.सतीप्रथेविषयी माहिती

अखेर सती प्रथा गेली. गती आली. स्त्री शिकू लागली. शिक्षण, अर्थार्जन अशा पायऱ्या चढत तिने चक्क अंतराळात झेप घेतली. सारं कसं मनाजोगं झालं. पण तिचं जळणं, सोसणं अन् तोंड दाबून मुकाट बसणं थांबलं का? अजिबात नाही. वृत्तपत्रातील बलात्कार, अ‍ॅसिड हल्ले, हुंडाबळी अन् मारहाणीच्या बातम्या ओरडून, किंचाळून सांगताहेत की स्त्रीचं जळणं अद्याप सुरू आहे. उच्चविद्याविभूषित व गलेलठ्ठ पगार घेणारी स्त्रीसुद्धा कधी कधी सासुरवासाच्या नरकात अशी पिळवटली जाते की, मानहानी सहन न होऊन आत्महत्येचं पाऊल उचलते. स्वत:ला मॉडर्न समजणाऱ्या मॉडेल्स अन् प्रथितयश अभिनेत्रींनासुद्धा स्त्रीदेहाचं प्रदर्शन अन् कधी कधी शोषण करू दिल्याशिवाय पर्याय उरत नाही. हे सारं पाहिलं की वाटतं आजही स्त्रीचं ‘सती’ जाणं सुरू आहे फक्त त्याचं स्वरूप, संदर्भ व परिस्थिती बदललीय.

स्त्री खरंच मुक्त झालीय का?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.